विट्यात उद्या होणार आमदार सुहास बाबर यांचा भव्य नागरी सत्कार

खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांचा तसेच या विजयात मोलाचा वाटा असणारे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांचा विटा शहराच्या वतीने उद्या रविवारी सायंकाळी ५ वाजता चौंडेश्वरी चौक विटा येथे भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित केल्याची माहिती विटा शहर सत्कार सोहळा समितीच्यावतीने माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदिवे व युवक नेते रेवण सूर्यवंशी यांनी दिली.

संजय भिंगार देवी व रेवण सूर्यवंशी म्हणाले आमदार सुहास बाबर यांनी विधानसभा निवडणुकीत नेत्र दीपक यश मिळवले परंतु आमचे नेते स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे प्रथम पुष्प स्मरण होईपर्यंत सत्कार सोहळा होऊ नये अशी भूमिका होती. त्यानंतर आमदार सुहास बाबर व युवक नेते अमोल बाबर यांचा हा नागरी सत्कार सोहळा रविवारी होणार आहे. स्वर्गीय आमदार अनिल भाऊ यांनी त्यांच्या राजकीय विषयात विटा शहरासाठी मोठे योगदान दिले आहे च्या पश्चात आमदार सुहास भैया आणि अमोल दादा यांनी पिठाच्या विकासासाठी जे कष्ट घेतले त्यातून शहरासाठी सुधारित नळ पाणी योजना, विटा बस स्थानक, टेंभू योजनेचा सहावा टप्पा, जिल्हा उपरुग्णालय अशी कोट्यावधीची मोठी कामे केली आहेत. तरी या सोहळ्यास उपस्थित रहावे हे आवाहन सत्कार समितीच्या  वतीने करण्यात आले आहे.