Lok Sabha Election Result: मोठी बातमी: सांगलीत विशाल पाटलांची जबराट आघाडी

 राज्यातील लक्षवेधी लोकसभा लढतींमध्ये समावेश असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजपच्या संजयकाका पाटील यांनी आघाडी घेतली होती. मात्र, सुरुवातीच्या अर्धा तासानंतर काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी प्रचंड मोठी आघाडी घेतली आहे. तर ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील या रेसमध्ये दिसेनासे झाले आहेत. (Lok Sabha Election Result Counting)

सांगलीत विशाल पाटील 11 हजार मतांनी आघाडीवर

सांगली लोकसभा दुसऱ्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील 11 हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपाचे संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर आहेत.