विटा येथील सतर्क नागरिक संस्थेतर्फे महिलांना विमा कवच

जागतिक महिला दिनानिमित्त सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्रच्यावतीने संस्थेतील सर्व महिला सदस्यांचा एक लाख रुपयांचा विमा उतरून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या वतीने ज्या महिला दैनंदिन जीवनातील वेळ काढून संस्थेसाठी विनामूल्य काम करत आहेत अशा महिलांचा दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीचा एक लाखाचा विमा संस्थेने देऊन त्यांचा एक आगळावेगळा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.

पुढेही अशाच प्रकारचे काम महिलांसाठी करण्याचे संस्थेचे उदिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यासाठी दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी अनिल यादव यांनीही खूप मोठे मोलाचे प्रतिभा कारंडे, विटा शहराध्यक्ष मंदा सहकार्य केले. संस्थेचे संस्थापक अजित जाधव, विटा शहराध्यक्ष शिराज शिकलगार, महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा शिंदे, दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधी सारिका पतंगे, खानापूर तालुकाध्यक्ष माने, नालंदा इनामदार, कल्पना साळुंखे, रोहिणी धोत्रे, जयश्री मुळीक, शीतल कांबळेफ रेणुका दुगम, शिवकन्या कदम, सानिका माळी, प्रेरणा शिंदे सचिन शिरतोडे उपस्थित होते.