विटा पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

विटा पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलीस ठाण्यातील सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यानिमित्त त्यांनी केक कापून आनंदही साजरा केला. यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी महिला दिनानिमित्त आपल्या महिला सहकाऱ्यांना कविता सादर करत शुभेच्छा दिल्या. पोलिस उपनिरीक्षक पूजा महाजन, सुप्रिया जाधव, रोहिणी शिंदे, वैशाली यादव, राजश्री खरमाटे, सुषमा देसाई, ज्योती बोबडे, किरण चव्हाण, प्रतिभा शिंदे यांच्यासह महिला कर्मचारी व होमगार्ड उपस्थित होते.