अनिलभाऊंचे दोन शिलेदार आले चर्चेत!

विटा येथे जयभवानी सांस्कृतिक गणेश मंडळाने महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी लाडक्या बहिणी योजनेचे अध्यक्ष अमोल बाबर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर संजय गांधी योजनेचे अध्यक्षा शितलताई बाबर व सोन्याताई बाबर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या दिमाखत संपन्न झाला.हा कार्यक्रम ॲड. विनोद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

महाराष्ट्राचे लाडके भाऊजी नितीन गवळी यांनी महिलांचे मनोरंजन केले. हा कार्यक्रम श्रीधर जाधव, सुजय गोसावी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आयोज केला होता. यावेळी रोहित पाटील रोहित पवार, मनोज पाटील मनीषा बागल माजी सभापती खानापूर पंचायत समिती गोकुळताई पाटील उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या ठिकाणी श्रीधर जाधव यांची कन्या जान्हवी श्रीधर जाधव हिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष अमोल बाबर यांचे मोठे वक्तव्य चर्चेत आले आहे. हे सरकार आले तर 1500 ते 3000 करण्यात येतील. हे त्यांचे वक्तव्य सद्या चर्चेत आले आहे.