अर्थसंकल्प अधिवेशनात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांचे जन्मगावी स्मारक उभारण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी लागणारी अर्थीक तरतुद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील जनतेने स्वागत केले आहे. गेल्या अनेक वर्षापासुन क्रांतीसिंह नाना पाटील यांचे स्मारक प्रलंबीत होते. यामुळे क्रांतीसिंह नाना पाटील यांचे कर्तृत्व दुर्लक्षीत राहीले होते.
संपुर्ण सांगली जिल्ह्यातील व महाराष्ट्रीतील जनतेची अपेक्षा होती,क्रांतीसिंह नाना पाटील यांचे कर्तृत्व व विचार नव्या पिढीला व्हावेत यासाठी त्यांचे स्मारक उभा करण्यात यावे. ना. अजित पवार यांनी हा निर्णय घेऊन खऱ्या अर्थाने क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कर्तृत्वाचा व विचाराचा सन्मान केला असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते निशिकांत भोसले पाटील यांनी व्यक्त केले.