इस्लामपुर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आनंदोत्सव साजरा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने एकरकमी एफआरपी कायदा कायम केल्याबद्दल येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर फटाके वाजवून जिलेबी, साखर वाटप करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना उसाचे ऊस बिल एकरकमी देण्याचा कायदा केलेला असताना राज्य सरकारने महाविकास आघाडी व महायुती सरकारने हा कायदा मोडून तीन टप्प्यांमध्ये एफआरपी शेतकऱ्यांना देण्यात यावी, असा जीआर काढला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या वतीने सदर अध्यादेश रद्द व्हावा व शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी रक्कम मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करण्यात आले होते.

या सुनावणीत राज्य सरकाराच्या विरोधात निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचे बिल एकरकमी देण्यात यावे, केंद्र सरकारचा आदेश राज्य सरकारला बदलता नाही. एकरकमी रक्कम ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा, असा आदेश जारी केला व महाराष्ट्र शासनाने केलेला जीआर रद्द करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव, राज्यप्रवक्ते अॅड. एस.यु. सन्दे, जिल्हा उपाध्यक्ष शहाजी पाटील, बळीराजा संघटनेचे अशोकराव सलगर, भुषण वाकळे, सुनील तेवरे, अनिल करळे, प्रदीप पाटील, प्रताप पाटील, भैरवनाथ कदम, अमर पाटील, रमेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.