राष्ट्रीय बहुजन कामगार संघटनेचे काम १४ वर्षे चालू आहे. याकाळात दहा कोटी पेक्षा जास्त विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून कामगारांच्या थेट खात्यात पैसे जमा करण्याचे काम केले आहे. राष्ट्रीय बहजन कामगार ना. महासंघ कामगारांचा सन्मान करी करणारी संघटना असल्याचे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे यांनी केले. इस्लामपूर येथे आयोजित राष्ट्रीय नाव बहुजन कामगार महासंघाचे दुसरे घरे, महा अधिवेशनात ते बोलत होते. डॉ. सचिन सांगरुळकर यांच्या हस्ते मर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे सह उद्घाटन करण्यात आले.
आदर्श सरपंच संदीप खोत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सागर तायडे मुंबई यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी संदीप खोत, सागर तायडे, प्रदीप साठे, प्रियांका तेवरे, नारायण चव्हाण, इसाक शेख यांनी मनोगत व्यक्त केली. तसेच नवीन पदाधिकारी यांची निवडी जाहीर करण्यात आली. यावेळी अश्विनी वाईंगडे, इंदुताई चव्हाण, छाया लोहार, उज्ज्वला जावीर, अनिता घोलप, शबाना मुलानी, पाकीजा पिपरी, उज्वला माने, मानसिंग माने, सुनीता लोहार, सागर लोहार, नारायण साठे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. आभार मानसिंग माने यांनी मानले.