आष्ट्यातील गंजीखाना भूखंड प्रश्न मार्गी लावा : निशीकांत पाटील

आष्टा नगरपरिषद हद्दीतील गंजीखाना भूखंडधारकांच्या हक्काच्या मिळकतीच प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक घेण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते निशिकांत भोसले पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. येथील २२८ नागरिकांचा गंजीखाना जमिनीचा प्रश्न गेली २० ते २५ वर्ष प्रलंबित आहे. गंजीखाना क्षेत्र दुरुस्ती न झाल्याने हा प्रश्न सुटलेला नाही. यामुळे या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. येथील नागरिकांनी ह प्रश्न सुटण्यासाठी अनेक वेळा महसूल विभागाचे उंबरे झिजवले आहेत. मात्र अद्यापही हा प्रश्न सुटलेला नाही. 

निवेदनात म्हटले आहे की, येथील गंजीखाना भूखंडधारकांची हक्काची मिळकत आहे. मात्र, अद्याप त्यांना त्यांच्या हक्काचा भूखंड व कब्जेपट्टी मिळालेली नाही. त्यामुळे या भूखंडधारकांवर अन्याय होत असून त्यांच्या प्रश्नांवर तातडीने तोडग काढावा. या मागणीचा गांभीर्याने विचार करावा. गंजीखाना भूखंडधारकांच्य प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे भोसले पाटील यांनी स्पष्ट केले. य मागणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन या भूखंडधारकांच्या न्याय्य हक्कासाठी कोणती भूमिका घेते, याकडे भूखंड धारकांचे लक्ष लागले आहे.