आष्ट्यातील जमिनीचा प्रश्न सोडविणार; निशिकांत भोसले-पाटील

सध्या अनेक भागात विकासकामे सुरु आहेत. अनेक निधी देखील नेतेमंडळींकडून मंजूर केले जात आहेत. आष्टा शहरात देखील अनेक सुविधांचा अभाव आहे. आष्टा येथील दत्त वसाहत येथे गांधीनगर, साईनगर आणि दत्त वसाहत मधील सर्वे क्रमांक ४, ६ आणि ९ मधील नागरिकांची बैठक झाली. गांधीनगर, साईनगर आणि दत्त वसाहतमधील नागरिकांचे जमिनीच्या झालेल्या प्रश्नामुळे मोठे हाल झाले आहेत. काही वर्षांपूर्वी हा प्रश्न सुटायला हवा होता. येथील नागरिकांच्या मागणीनुसार कोणत्याही परिस्थितीत गांधीनगर, साईनगर आणि दत्त वसाहत मधील सर्वे क्रमांक ४, ६ आणि ९ नऊचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार आहोत. यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात लवकरच बैठक घेणार आहोत, अशी माहिती निशिकांतभोसले-पाटील यांनी दिली. 

यावेळी बोलताना निशिकांत भोसले- पाटील पुढे म्हणाले, साईनगर, गांधीनगर आणि दत्त वसाहत मधील जागेचा प्रश्न काही लोकांनी जाणीवपूर्वक गेली अनेक वर्ष प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्या खोलात न जाता कोणत्याही परिस्थितीत येथील जागेचा प्रश्न सोडवून नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचे आहे. येथील नागरिकांनी स्थानिक नागरिकांची बैठक घेऊन निवडलेल्या दोन पर्यायावर चर्चा करा. निर्णय घ्या. तुम्ही घेतलेल्या निर्णयाबरोबर मी ठामपणे उभा राहणार आहे. लवकरच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात येथील नागरिकांच्या उपस्थितीत बैठक घेऊन साईनगर, गांधीनगर आणि दत्त वसाहतीचा प्रश्न सोडवण्याचा यशस्वी प्रयत्न करू.