बँक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला असून हा भत्ता मे, जून आणि जुलै 2024 साठी देण्यात येणार आहे. इंडियन बँक असोसिएशननं (IBA) 10 जून 2024 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे याची घोषणा केली.या घोषणेनुसार हा महागाई भत्ता १५.९७ टक्के इतका असणार आहे.
यावर्षी मार्चमध्ये, IBA आणि बँक कर्मचारी संघटनांनी 17 टक्के वार्षिक वेतनवाढीवर सहमती दर्शविली होती. यामुळं सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर सुमारे 8,284 कोटी रुपयांचा अतिरिक्त वार्षिक खर्चाचा बोजा पडणार आहे. नोव्हेंबर 2022 पासून लागू होणाऱ्या वेतनवाढीचा फायदा तब्बल 8 लाख बँक कर्मचाऱ्यांना होणार आहे.
बँक कर्मचाऱ्यांनी पाच दिवसांचा कामाचा आठवडा व्हावा अशी मागणी केली आहे. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि बँक युनियननं या प्रस्तावावर सहमती दर्शवली आहे. पण आता सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
मार्च 2024 मधील संयुक्त घोषणेनं हा करार PSU बँक कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून 5 दिवसांच्या कामाचा मार्ग मोकळा होईल. कारण संयुक्त घोषणेत सर्व शनिवारी बँक सुट्टी म्हणून ओळखली जाणार आहे.