आष्टा येथे बहुजन समता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

समाजातील सर्वसामान्य, कष्टकरी जनतेच्या न्याय हक्कासाठी बहुजन समता पार्टी सदैव तत्पर राहील, असे प्रतिपादन पार्टीचे संस्थापक, मार्गदर्शक प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी केले. ते आष्टा येथील बहुजन समता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी आष्टा शहर कार्यकारणीसह शाखा क्रमांक १, २ व ३ चे उद्घाटनही करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर समाज मंदिर येथेही उद्घाटन करण्यात आले. प्रा. सकटे म्हणाले, या जनसंपर्क कार्यालयामुळे गोरगरीब, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न लवकरात लवकर सुटतील.

सामान्य माणसाला आधारवड वाटावे असे कार्य पदाधिकारी व कार्यकत्यांनी करावे असे आवाहन त्यांनी केले. नियोजन व स्वागत जिल्हा कार्याध्यक्ष विजय दणाणे यांनी केले. विजय दणाणे म्हणाले, प्रा. डॉ. सकटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेपर्यंत पार्टीचे ध्येयधोरणे पोहचवून संघटन मजबूत करून जनतेच्या हक्कासाठी लढा उभारू, जनतेला प्रशासकीय पायाभूत सुविधा, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊ.