आष्टा येथील मिसाळवाडी या भागात असलेल्या किराणा मालाच्या दुकानातून पोलिसांनी रोख रकमेसह गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व सुपारी असा एकूण १ लाख ११ हजार ३७२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आष्टा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे.
हणमंत भिवा कांबळे (वय २४, रा. नरवाड, ता. मिरज, सध्या रा. मिसाळवाडी, आष्टा) असे याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला असता पोलिसांना रोख रक्कम ९८० रुपये, तसेच गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व सुपारी असा एकूण १ लाख ११ हजार ३७२ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
पोलिसांनी सदरचा मुद्देमाल जप्त करून संशयितास ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिस नाईक जितेंद्र जनार्दन थोरात यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आह