विटा येथील प्रतिथयश शिवप्रताप मल्टीस्टेट संस्थेच्या सभासद सौ. नंदा कोकरे यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अशा वेळी संस्थेने मायेचा आधार देत त्यांना उन्नती महिला बचत खाते अंतर्गत विम्याच्या माध्यमातून त्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च दिला. यामुळे त्यांना केवळ आर्थिक मदतच मिळाली नाही, तर त्यांच्या कुटुंबाला एका नवीन आशेचा आणि सुरक्षिततेचा आधारही मिळाला आहे.
उन्नती महिला बचत खाते ही एक विशेष योजना असून, यामध्ये महिलांना विमा, वैद्यकीय खर्च आणि बचत योजनांसाठी विविध फायदे दिले जातात, या विमा योजनेंतर्गतच अपघात झालेल्या महिलेला आपातकालीन परिस्थितीमध्ये आर्थिक सहाय्य मिळाले आहे. विम्याच्या सहाय्याने कुटुंबाचा आर्थिक परिस्थिती सावरणेसाठी मदत झाली.