आज मंगळवारी म्हणजेच 24 डिसेंबरला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एक खळबळजनक घटना समोर आलेली आहे. नेवरी हिंगणगादे शिवेवर बिबट्याने ऊसतोड महिलेवर हल्ला केलेला आहे. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे. हिंगणगादे शिवेवर ऊसतोड करणारे अनेक लोक झोपडी करून राहत आहेत. आज मंगळवारी पहाटे पाच वाजता लिंबाबाई राठोड ही महिला आपल्या पाल्यात झोपली असता बिबट्याने या महिलेवर हल्ला केला.
बिबट्याने केलेल्या या हल्ल्यात ऊसतोड महिलेच्या डोक्याचा लचका काढला असून सदर महिलेला गंभीर जखमी झालेली आहे. बिबट्याने हल्ला करताच महिलेने आरडाओरडा केला. इतर पाल्यातील लोकांनी आरडाओरडा करून या महिलेची बिबट्यापासून सुटका केली. यानंतर लोकांची गर्दी झाल्यानंतर बिबट्याने तेथून पलायन केले. या महिलेला अधिक उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेले आहे.