आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावात काळ सायंकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसाचा द्राक्ष, डाळिंबांना मोठा फटका बसला आहे. वारे जोरदार सुटले होते. त्या वाऱ्यामुळे ज्वारी, हरभरा, गहू पिकांचे नुकसान झाले. संध्याकाळी तळेवाडी, बाळेवाडी, पात्रेवाडी, खरसुंडी, झरे, मासाळवाडी, लेंगरेवाडी, शेटफळे, कोळे या सर्व परिसरात जोरदार पाऊस झाला. बुधवारी दिवसभर नागरिक उकाड्याने परेशान झाले होते. सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली.
शेतकऱ्यांनी सांगितले अद्याप शेकडो एकर बागा तर शेटफळे, पात्रेवाडी, तळेवाडी, बाळेवाडी, खरसुंडी, लेंगरेवाडी, मासाळवाडी, माडगुळे, कोळे, परिसरात या भागामध्ये द्राक्ष काढणे सुरुवात झाली आहे. त्या भागातही अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.