आटपाडीतील अतिक्रमणांबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल : सादिक खाटीक यांची माहिती

आटपाडी शहरातील दोन्ही ओढा पात्रे आणि शहरातील शासकीय जागा आणि अन्य ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई करावी. शहराच्या विकासासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा , या मागणीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. योग्य कार्यवाहीसाठी संबंधित विभागाला आदेश दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी दिली . खाटीक म्हणाले , आटपाडी तलावापासून शहराकडे येणाऱ्या दोन्ही ओढा पात्रातील अतिक्रमणे काढावीत . त्याचबरोबर ओढा पात्राच्या परिसरात ऑक्सिजन पार्क , चिंचबन , चालण्याचा ट्रॅक , व्यापार संकुल , आठवडा बाजार , अद्ययावत स्मशानभूमी , प्रशस्त रस्ते अशा विविध विकास योजना राबवाव्यात , अशी मागणी करण्यात आली आहे. शासकीय जागांवरील अतिक्रमण , तसेच देवस्थान ईनाम वर्ग ३ च्या जमिनीवरील अतिक्रमणे तात्काळ काढण्यात यावीत .