इस्लामपूर येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावून तिचा मानसिक छळ

इस्लामपूर येथील पीडित मुलीच्या आईचे निधन झाले आहे. तिचा सांभाळ वडील करतात. मुलगी इयत्ता आठवीत शिकत होती. ११ डिसेंबर २०२४ रोजी मुलीच्या वडिलांनी व मध्यस्थी भागा मावशी यांनी जबरदस्तीने तिचा विवाह भटजी विद्याधर याच्या घरी लावून दिला. यावेळी तिचे सासू, सासरे उपस्थित होते. लग्नानंतर मुलीने पतीशी शरीर संबंध ठेवावे यासाठी तिला त्रास देऊ लागले.

तिने पतीशी संबंध ठेवण्यास नकार दिल्याने सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली आणि मानसिक त्रास दिला. काही दिवसांनी पीडित मुलीला माहेरी पाठवून दिले. तिने घडलेल्या प्रकार तिच्या काकांना सांगितला. त्यांनी पोलिसांचा ११२ नंबरवर तक्रार द्यायला सांगितले. मुलीने पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनी वडील, मध्यस्थी भागा मावशी, भटजी विद्याधर, पती, सासरा, सासू यांच्या विरोधात फिर्याद दिली.