विटा ते लेंगरे रस्त्यावरील पाण्याच्या टाकी जवळून २२ मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास दुचाकी चोरी झाल्याची माहिती संजय भैरू बोंद्रे यांनी दिली होती. या चोरीचा तपास करत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस महेश संकपाळ व अक्षय जगदाळे यांना खबऱ्याद्वारे पाटील वस्ती विटा येथे एकजण चोरी केलेल्या दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती मिळाली. तेथे पोलिसांनी सापळा रचून मुलाला ताब्यात घेतले.
चाकीबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ती दुचाकी गाडी लेंगरे रस्त्यावरून चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्याने सांगली पोलिस ठाणे हद्दीतून अन्य दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातील पन्नास हजाराच्या दोन दुचाकी व रोख चौदा हजार रुपये असा एकूण ६४ हजारांचा मुद्दे माल जप्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, चोरटा अल्पवयीन असल्याने त्यास नोटीस देण्यात आली आहे.