आटपाडीत किरकोळ वादातून एकास मारहाण; तिघांवर गुन्हा

आटपाडी, आटपाडीतील हॉटेल विरुंगुळासमोर गटारीचे काम सुरु असताना गुरुवारी झालेल्या वादातून मारहाण झाली. याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारुती ताताबो सकट (वय ५३,रा. विद्यानगर) यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली.

फिर्यादीत म्हटले आहे की, सकट हे हॉटेलसमोर काम करत असताना संशयित उषा लक्ष्मण सूर्यवंशी, सुयश लक्ष्मण सूर्यवंशी आणि लक्ष्मण किसन सूर्यवंशी (सर्व रा. आटपाडी ) येथे आले. फिर्यादी सकट व सुयश देशमुख यांना संशयितांनी शिवीगाळ करीत वाद घातला. दरम्यान, उषा सूर्यवंशी हिने रागाच्या भरात मारहाण केली.