हातकणंगले विधानसभेचे आमदार अशोकराव माने बापू यांची महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीच्या समिती सदस्यपदी आज निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी हि ची निवड केली. आमदार अशोकराव माने यांनी अनेक वर्ष संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती व दलित समाजाच्या उन्नतीसाठी खूप संघर्ष केले आहे. आणि त्यातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामान्य जनतेच्या कल्याणा आणि त्यांच्यासाठी निर्माण केलेल्या संघर्ष पाहून हातकणंगले तालुक्याच्या जनतेने त्यांना मोठ्या मताधिक्याने अशोकराव माने यांना आमदार केले.
विधानसभा अध्यक्ष माननीय श्री. राहुल नार्वेकर यांनी अशोकराव माने यांच्या कार्यकर्तुत्वाची दखल घेत ही निवड केली. राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री अजितददा पवार, आमदार विनय कोरे यांचे या कामी मार्गदर्शन मिळाले.त्यांच्या या निवडीने हातकणंगले विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.