खानापुरात द्राक्ष औषध अंश तपासणी प्रयोगशाळा,संशोधन केंद्र उभारणी

विटा(vita) द्राक्ष अंश तपासणी प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र खानापूर तालुक्यात लवकरच उभारणार आहे,अशी घोषणा आमदार सुहास बाबर यांनी केली.

येथील दि खानापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी ते बोल्त होते. संघाचे अध्यक्ष हेमंत बाबर अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष सदाशिव हसबे , आनंदराव पाटील,भरत लेंगरे,राजू मुल्ला,गणपतराव भोसले ,कृष्णदेव शिंदे, संजय मोहिते, सयाजी धनवडे,नामदेव चव्हाण उपस्थित होते. यावेळी खरेदी-विक्री संघ करण्याचा ठराव करण्यात आला.

आमदार बाबर म्हणाले,आज या संस्थेला अनिलभाऊंचे नाव देताना एका डोळ्यात आसू, तर दुसऱ्यात हसू आहे. ज्या शेतकऱ्यांनी भाउंबर मनापासून प्रेम केले, त्यांच्या ऋणातून उतराई होणे कठीण आहे. भाऊंनी टेंभूचे पाणी आणून या भागाचे नंदनवन करण्याचे स्वप्न बघितले आणि ते प्रत्यक्षात आणले. मात्र पाणी आल्यानंतर होणारा बदल लक्षात घेऊन आवश्यक सुविधा उभारण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू . तालुक्यात द्राक्ष निर्यातीसाठी औषधांचा अंश तपासणी गरजेची असते. अशी प्रयोगशाळा विट्यात कृषी विभागाच्या जागेवर उभारू.हेमंत बाबर यांनी अहवाल वाचन करताना , संघाला आर्थिक वर्षात ८२ लाख ४९ हजार नफा झाला असून १५ टक्के लाभांश देणार असल्याचे जाहीर केले.

महेश घोरपडे यांनी आभार मानले.रामचंद्र भिंगारदेवे यांनी सूत्रसंचालन केले. देवदत्त राजोपाध्ये, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.