विटा येथे इफ्तार पार्टीचे आयोजन; हिंदू-मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोख्यासाठी मागितली दुआ

विटता येथे रमजान महिन्यानिमित्त शेर ए हिंद युथ फाउंडेशन आणि डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सोशल वेल्फेअर यांच्या वतीने दावत-ए इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. इफ्तार पार्टीवेळी मुस्लीम बांधवांनी सामूहिक प्रार्थना करून हिंदू मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक सलोख्यासाठी दुआ मागितली. पवित्र रमजान महिन्यानिमित्त शेर ए हिंद युथ फाउंडेशन आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सोशल वेल्फेअरच्या वतीने शासकीय आयटीआय कॉलेजजवळील मुजावर कॉलनी मोहम्मदिया मस्जिद परिसरात इफ्तार पार्टी आयोजित केली होती. यावेळी आयोजित केलेल्या दावत-ए इफ्तार पार्टीत अनेक हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रमजान महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करतात. उपवास सोडण्यासाठी रोजा इफ्तारचे आयोजन केले जाते. यावेळी माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील, नगरसेवक फिरोज तांबोळी, युवा नेते विनोद पाटील, विपुल तारळेकर, जमीर मुजावर, एजाज मुल्ला, मुबीन सय्यद, मोहसीन आगा, फिरोज मुजावर, जुनेद मोमिन, सिराज मुजावर, रेहान मुल्ला, अन्सार मुलानी, रहीम मुजावर, खलील सर, तसलीम तांबोळी, विशाल पाटील, फारुक शिकलगार, परवेज शिकलगार, समीर मुल्ला, सुजात बागवान, सोहेल पटेल, ताहीर मुजावर, आमिर मजावर यांच्यासह मुजावरवस्ती परिसरातील शेकडो मुस्लिमबांधव आवर्जून उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील यांनी मुस्लीम बांधवांशी संवाद साधत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.