आष्टा येथे शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने महायुती सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शिवाजी चोरमुले म्हणाले, सरकार स्थापन होऊन जवळपास १०० दिवस उलटले परंतु सरकारने निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेली आश्वासने पुर्ण करण्यात अपयशी ठरले आहे, महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे खोटे आश्वासन दिले आहेत. खते, बियाणे, औषधे दर दुप्पट वाढवले, निवडून आल्यानंतर लाडकी बहिण योजनेला विविध प्रकारचे निकष लावून नावे वगळली, महिलांच्या वरती अन्याय व अत्याचार यात वाढ होऊन गुन्हेगार मोकाट फिरत आहेत.
हॉस्पिटलमध्ये महिलांचे पैश्याविना मृत्यू होत आहेत. पेट्रोल आणि डिझेल व घरगुती गॅस, सुनील माने, राजू माने, राजकेदार सिलिंडरचे दर वाढवले, आणि सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावली आहे. राज्यामध्ये महापुरुषांचा अवमान होत आहे. मंत्री शेतकरी, महिला, महापुरुष यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करीत आहेत. आशा फसव्या, भावनाशून्य सरकारचा व मंत्र्यांचा महायुती सरकारचा आष्टा शहर युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी प्रविण वारे, प्रकाश रुकडे, विजय मोरे, प्रभाकर जाधव, बाबसो सिद्ध, अनिल पाटील आटुगडे सयाजी गावडे, शशीकांत भानुसे, सोमाजी डोंबाळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.