हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथील उरुसानिम्मित बैलगाडी शर्यत संपन्न

हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथे जंदीसो व ब्रॉनसो उरुसाला गुरुवार पासून सुरवात झाली आहे. त्यामुळे कबनूर येथे ग्रामदैवत जंदीसो व ब्रॉनसो उरुसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कबनूर गावातील पंचगंगा मैल खड्डा येथे बैलगाडी शर्यतिचे आयोजन करण्यात आले होते. उरुस समिती व मान्यवरांच्या हस्ते निशाण दाखवून बैलगाडी शर्यत सुरू करण्यात आली. या शर्यतित आदत व एक दुस्सा बैलगाडी शर्यतीत सतिश बेद्री यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला.

तसेच जनरल ब गट बैलगाडी शर्यतीमध्ये बंडा शिंदे (दानोळी) यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. आदत व एक दुस्सा बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक सतीश बेट्री (बेंद्री), द्वितीय क्रमांक चेतन धन्यकुमार पाटील (कबनूर), तृतीय क्रमांक सोनू वड्ड (दानोळी) यांच्या बैलगाडीने पटकावला. जनरल ब गट बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक बंडा शिंदे (दानोळी), द्वितीय क्रमांक राजेंद्र पाटील (चिंचली), तृतीय क्रमांक प्रमोद डांगरे (इचलकरंजी) यांच्या बैलगाडीने पटकाविला. यावेळी बैलगाडी शर्यत प्रेमी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.