हातकणंगले तालुक्यातील आळते हद्दीतील इंडो काऊंन्ट मिल मधील कामगारांनी त्यांच्या न्याय हक्क मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत गेल्या महिनाभरापासून हे आंदोलन सुरु आहे. इंडो काऊंन्ट मिल मधील कामगार लोकशाही मार्गाने गेल्या काही दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी अनेक प्रयत्न करत आहेत. मात्र मिल प्रशासन कोणतीच दाखल घेत नाहीये आणि कुठलेच सकारात्मक चर्चा अथवा प्रयत्न होत नसल्याने कामगारांनी काम बंद ठेवले आहे. स्थानिक कामगारांनी मिलच्या प्रवेश द्वारासमोरच ठिय्या आंदोलनाला सुरवात केली होती.
शनिवारी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आंदोलक कामगारांची भेट घेत आंदोलनास त्यांचा पाठींबा जाहीर केला. मिल प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर वेळप्रसंगी रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशाराहि यावेळी त्यांनी दिला. यावेळी पंचायत समिती उपसभापती प्रविण जनगोंडा, दिपक वाडकर, वाडकर, जावेद मुजावर, सुरेश आळतेकर, सागर खोत, दिपक शिंदे, शशिकांत घाटगे, संदिप बाचणकर यांच्यासह महिला व पुरूष कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.