पेठ उत्तर भाग सोसायटीच्या चेअरमनपदी भूषण पाटील यांची बिनविरोध निवड

वाळवा तालुक्यातील पेठ येथील पेठ उत्तर भाग विकास सोसायटीच्या चेअरमनपदी भूषण पाटील तर व्हा. चेअरमन पदी शंकर गावडे यांची निवद करण्यात आली. वनश्री दुध संघाचे चेअरमन व भाजप नेते सम्राट महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध हि निवड करण्यात आली. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. नुतन पदाधिकाऱ्यांनी निवडीनंतर वनश्री नानासाहेब महाडीक यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. सम्राट महाडिक म्हणाले, विकास सोसायटी ही शेतकऱ्यांचा कणा आहे. ती चांगल्या प्रकारे चालवा. गोरगरीब शेतकरी सभासदांचे प्रश्न सोडवा.

कुठला ही भेदभाव न ठेवता सर्व समावेशक कामे करा. यावेळी जि.प.चे माजी सभापती जगन्नाथ माळी, माजी उपसरपंच शंकर पाटील, वनश्री पतसंस्थेचे चेअरमन राहुल पाटील, ग्रामपंचायत सदस्य धोडीराम कदम, विकास दाभोळे, पेठ सोसायटीचे संचालक अमोल कदम, भिमराव कदम, असिफ जकाते, अमीर ढगे, तुकाराम पाटील, संदीप माने, अभिमन्यू कदम, काका कदम, अनिकेत कदम, रविंद्र कदम, सुनील नायकल शिवाजी साळुंखे, माणिक पाटील, विशाल शेटे, स्वप्निल साळुंखे, विक्रम बाबर, सुहेल ढगे, सागर शेलार उपस्थित होते.