इस्लामपूर येथे आ. जयंत पाटील यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या रमजानच्या शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प व पेढे देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील हिंदु-मुस्लिम ऐक्य राज्याला आदर्शवत आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व जय हनुमान पतसंस्थेचे कुटुंबप्रमुख शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे हा उपक्रम राबविला जात आहे. जय हनुमान पतसंस्था बँकिंग व्यवसायाबरोबरच सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असते. रक्तदान शिविर, दुष्काळग्रस्त, पूरग्रस्तांना मदत, पारायण सोहळ्यास मदत, यशस्वी विद्यार्थाचा सत्कार, ज्येष्ठ नागरिक दिन व महिला दिनानिमित्त विशेष व्यक्तींचा गौरव असे अनेक उपक्रम राबविले जातात.

यावेळी शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील, संस्थेचे संचालक संदीप माने, माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव चव्हाण, माजी नगरसेवक विलास ताटे, पिरअली पुणेकर, विश्वनाथ डांगे, आयुव हवलदार, राजारामबापू कारखान्याचे संचालक शैलेश पाटील, राजेंद्र कांबळे, बाळासाहेब पाटील, संदीप पाटील, सुहास हडि, बाळासो कोळेकर, मुनीर इबुशे, रणजित गायकवाड, विशाल सुर्यवंशी, दिग्विजय पाटील, अंगराज पाटील, सचिन कोळी उपस्थित होते.