इस्लामपुर शहरात भाजपतर्फे मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा; सर्व भारतीयांसाठी दुवा

इस्लामपूर शहरात मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान ईद सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो मुस्लिम बांधवांकडून मस्जिदीमधून सामूहिक नमाज पठण करण्यात आले. सकाळी सात वाजल्यापासुन शहरातील ईदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण झाले. नमाजानंतर सर्व भारतीयांसाठी दुवा करण्यात आली. माजी नगराध्यक्ष स्व. अशोकदादा पाटील, बाबा सूर्यवंशी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्याची सुरु केलेली परंपरा भाजपचे नेते विक्रम पाटील यांनी ३९ वर्षापासून अखंडपणे चालू ठेवली आहे.

ईद निमित्त शिराळा नाका येथे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी कृषी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत, भाजपचे नेते विक्रम पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीपराज पवार, अशोक पाटील, इंद्रजीत पाटील, महेश पाटील, आनंदराव शिंदे, कपिल सूर्यगंध, समीर आगा, रफिक तांबोळी, सुभान नायकवडी, अल्ताफ तहसीलदार, हारूण फकीर, रियाज डाके, मन्सूर नायकवडी, निहाल गणीभाई, बबन कदम, भूषण पवार, हुजेपा मुल्ला, खुदा खिलारे, अशपाक पुणेकर यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देवून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. सर्व नागरिकांनी एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या.