खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे माजी कुलगुरू एन.जे. पवार यांचा नागरी सत्कार संपन्न 

खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे माजी कुलगुरू एन.जे. पवार यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होणार आहे हे कोणा एका व्यक्तीचे यश नसून हे सर्वांचे एकत्रित यश असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व डी वाय .पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन जे पवार यांनी खानापूर येथे केले. डॉ . एन . जे . पवार यांचा सोमवारी खानापूर येथील राम मंदिर चौकामध्ये नागरी सत्कार करण्यात आला. कुलगुरू असताना विविध समितींच्या मार्फत सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील जागांची विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी पाहणी करण्यात आली.

आगामी काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत असून या बदलाला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असणारे अभ्यासक्रम व या भागातील वैशिष्ट्यपूर्ण पिकांच्या वर संशोधन करणाऱ्या संस्था या विद्यापीठ उपकेंद्रांमध्ये सुरू करण्यात आल्या पाहिजेत यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी स्वामी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, रयतशिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, डॉ मोहन राजमाने, डॉ. मेघा गुळवणी, डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्यासह परिसरातील अनेक महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यापीठ जन चळवळीमध्ये सहभागी घेतलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला