सन २०२४- २०२५ आर्थिक वर्षात संस्थेकडे ठेवी १३४ कोटी ४९ लाख असून १११ कोटी २३ लाख इतके कर्ज वितरण केलेले आहे. संस्थेची सभासद संख्या २०,६७७ इतकी आहे. संस्थेचे वसूल भागभांडवल ६ कोटी ७ लाख असून संस्थेचा राखीव व इतर निधी २० कोटी ९९ लाख इतका आहे. संस्थेने राखीव निधी रू. ५ कोटी ७५ लाखाची स्वतंत्र गुंतवणूक बँकेत केलेली आहे. संस्थेने एकूण ठेवीच्या ३९.८२ टक्के सुरक्षित गुंतवणूक रक्कम रू. ५५ कोटी १५ लाख इतकी केलेली आहे.
संस्थेचा एकूण व्यवसाय २४९ कोटी ७२ लाख इतका झालेला असून खेळते भांडवल १७७ कोटी १ लाख इतके आहे . संस्थेचा सीआरएआर भांडवल पर्याप्तता निधी १५.९७ टक्के इतका आहे. संस्थेचा सीडी रेशो ७३.०८ टक्के इतका आहे. श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेला सन २०२४ २०२५ या आर्थिक वर्षात निव्वळ नफा ३ कोटी रूपयांचा झाला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मदन कारंडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. प्रसिध्दी पत्रकामध्ये पुढे संस्थेने प्रतिकूल परिस्थितीत उत्तम प्रगती साधली आहे. संस्थेचा एनपीए शून्य टक्के आहे.
संस्था सभासदांना दरवर्षी १० टक्के लाभांश देत आली आहे. प्रधान कार्यालय व आठ शाखातून उत्तम पध्दतीने कामकाज करीत आहे. संस्थेचे स्वतःचे डाटा सेंटर असून ग्राहकांना आरटीजीएस, एनईएफटी, ईसीएस कोड, एसएमएसबँकिंग तसेच क्युआर स्कॅन कोड इ. सेवा पुरविल्या जातात. असे ही श्री कारंडे यांनी सांगितले. उपाध्यक्ष शिरीष कांबळे, संचालक भगवान कांबुरे, विजयबाबर, संजय घायतडक, गजानन कडोलकर वाघमोडे, सचिन शिंदे, सौ. बिबता माछरे, श्रीमती दिशा जाधव, शिवाजी कारंडे, संजय झुंजकर, सुनील पाटील, जनरल मॅनेजर भारत गिड्डे आदि उपस्थित होते.