हातकणंगले तालुक्यातील आळते येथील अल्लमप्रभू डोंगरावर कुडल संगमच्या धर्तीवर उभारल्या जात असलेल्या जगदगुरु अल्लमप्रभू योग पीठ येथे ५ व ६ एप्रिल रोजी २० वा लिंगायत गण मेळावा संपन्न होणार आहे. यामध्ये विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम प्रमुख मान्यवरांच्या व महाजगद्गुरु डॉ. गंगादेवी माताजी आणि विविध योगपीठाचे पिठाधिश उपस्थित राहणार आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली गण मेळावा संपन्न होणार असल्याची माहिती अल्लम प्रभू योग पीठाचे पीठाधिश बसवकुमार स्वामीजी यांनी दिली.
लिंगायत गण मेळाव्याच्या पहिल्या दिवशी शनिवारी सामुदायिक इष्टलिंग उपासना, धर्मगुरु पुजा, प्रार्थना, ध्वजारोहण, उद्घाटन, मान्यवरांची व्याख्याने, स्वामीजी व माताजी यांचे मार्गदर्शन असे कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमास वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर , आम. राजेंद्र पाटील यड्रावकर, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले वनमंत्री गणेश नाईक, पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई आम. अमल महाडिक, आम. राहुल आवाडे, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दुसरे दिवशी रविवारी धार्मिक कार्यक्रमासह डॉ. विद्या पाटील, डॉ. अमरनाथ सोलापूरे, प्रा. भिमराव पाटील, प्रा. आनंद कर्णे, अविनाश भोसिकर आदिंची धार्मिक विषयावर व्याख्याने, पिठारोहण संदेश यासह अन्य कार्यक्रम होणार आहेत. याप्रसंगी खासदार धैर्यशिल माने, शशिकला जोल्ले, आण्णासो जोल्ले, धनंजय महाडीक, आमदार विनय कोरे, अशोक माने, सुरेश हाळवणकर, अरुणराव इंगवले, सरपंच अजिंक्य इंगवले, अशोक स्वामी, प्रसाद खोबरे, आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.