व्यापाऱ्यांसाठी नविन उपक्रम राबवणार मदन कारंडे यांचे आश्वासन

महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी इचलकरंजीतील व्यापाऱ्यांशी संवाद साधला.राधाकृष्ण कॉलनी येथे व्यापाऱ्यांशी संवाद साधत व्यापाऱ्यांच्या समस्या, आव्हाने व त्यांच्या क्षेत्रातील गरजा जाणून घेतल्या. तसेच व्यापार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून नवे उपक्रम राबवणार, असे आश्वासन मदन कारंडे यांनी दिले. इचलकरंजीच्या विकासासाठी ठोस योजना साकारण्याचा संकल्प व्यक्त केला.

दरम्यान, परिवर्तनासाठी एकत्र येऊ, इचलकरंजीच्या प्रगतीसाठी नवा अध्याय लिहू, असा आशावादी संदेश देत त्यांनी या परिवर्तनाच्या प्रवासात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी मँचेस्टर आघाडीचे प्रमुख सागर चाळके, माजी उपनगराध्यक्ष रणजीत जाधव, जागृती यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांच्यासह इचलकरंजीतील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.