इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील सहकारी दूध संघामार्फत गुढीपाडवा सणानिमित्त श्रीखंडाची ३० टन इतकी विक्रमी विक्री तर रमजान ईद निमित्त १ लाख २५ हजार लिटर दुधाची विक्रमी विक्री झाल्याची माहिती संघाचे चेअरमन नेताजीराव पाटील, व्हा. चेअरमन शशिकांत पाटील यांनी दिली. कृष्णा दूध व दूध उत्पादने ही गुणवत्तापूर्ण दर्जेदार असलेले मार्केटमधून मोठ्या प्रमाणात कृष्णा दुग्धोत्पादनांना मागणी आहे. विक्रमी विक्रीबद्दल प्रोडक्शन मार्केटिंग इंजिनिअरिंग गुणनियंत्रण संकलन व सर्व कर्मचाऱ्यांचे चेअरमन, व्हा. चेअरमन यांनी अभिनंदन केले.
संघाचे मार्गदर्शक आ. जयंतरावजी पाटील व युवा नेते प्रतीक पाटील यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाने संघाची घोडदौड सुरू आहे. संघामार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दूध खरेदी दर देण्यात येतो. सध्या उन्हाळा सीजन सुरु असलेले दूध उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. असे असतानाही संघावर असणाऱ्या दूध उत्पादकांच्या विश्वासामुळे दूध संकलनात कोठेही कमतरता जाणवले नाही. यावर्षी राजारामबापू पाटील सहकार्य दूध संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षे निमित्ताने संघात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. संघाचे कार्यकारी संचालक डॉ. एस.डी.डोपे उपस्थित होते.