इस्लामपूर शहरातील कामेरी नाका परिसरातील एका हॉटेलसमोर लावलेल्या ३० हजार रुपये किमतीच्या दुचाकीची (क्र. एमएच १० ईजी ७३९०) अज्ञात चोरट्याने चोरी केली.ही घटना ५ जूनरोजी घडली.याबाबत सार्थक सूर्यकांत पेठकर याने पोलिसात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सुरू आहे.इस्लामपूर परिसरात दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून चौका चौकात सीसीटीव्ही बसवून पोलिसांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.