इस्लामपुरात प्रशासनाची मतदार जागृतीसाठी रॅली!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी इस्लामपूर शहरात प्रशासकीय निवडणूक यंत्रणेकडून T मतदार संवाद यात्रा काढण्यात आली. इस्लामपूर नगर परिषद आणि वाळवा पंचायत समितीच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. येथील पालिकेच्या आवारातून मतदार संवाद रॅलीला सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली तहसील कचेरी परिसरात आली.

तेथे प्रांताधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन व तहसीलदार प्रदीप उबाळे यांच्या हस्ते कृषी विभागातील निवृत्त आरेखक बाळासाहेब चौधरी यांनी लिहिलेल्या मतदार जनजागृती गीत पुस्तकीचे (स्वीप) प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर उपस्थित होते. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रशासनाने र ली तसेच अनेक उपक्रम राबविले.