सांगोला तालुक्यात खोकला उलटीमुळे दवाखान्यात गर्दी! बालकांचे प्रमाण अधिक

सांगोला तालुक्यातील कोळा, कराडवाडी, कोंबडवाडी परिसरात बदलत्या हवामानामुळे नागरिकांचे आजारी पडण्याचे प्रमाण जसे वाढले आहे तसेच बालकांमध्येही आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

सर्दी खोकला ताप व उलट्या आजारी असलेल्या बालकांचे प्रमाण अधिक आहे. एरवी दवाखान्यात उपचारांसाठी येणाऱ्या बालकांच्या तुलनेत मागील आठवडाभरात हे प्रमाण 15 ते 20 टक्क्यांनी वाढले आहे.पालकांनी वेळीच उपचार घेतले तर बालकांचे आरोग्य चांगले राहील, असे बालरोगतज्ज्ञांनी सांगितले आहे.

कोळे भागात गेल्या एक आठवड्यापासून हवामानात बदल झाल्याचे दिसून येत आहे. बहुतांश वेळा ढगाळ संस्थेत हवामानामुळे हवेतील गारवा वाढलेला आहे. तसेच आठवड्यातील सरासरी कमाल तापमान २९ वार्षिक अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६ अंश येणार सेल्सिअस इतके होते.

ऐन हिवाळ्यात तापमापीचा पारा घसरल्यामुळे मोठ्या नागरिकांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच आजारी बालके उपचारांसाठी येण्याचे प्रमाण वाढलेले आहे.लहान बालकांमध्ये संसर्गजन्य आजाराचे प्रमाण अधिकअसते. तीव्र स्वरूपाच्या हवामान बदलामुळे सर्दी, खोकला, ताप व उलट्यामुळे आजारी पडलेली बालकेरुग्णालयात येत आहेत.

अनेकदा सर्दीमुळे नाक चोंदल्यामुळे झोपेत बालकांची घरघर ऐकू येते. बदलत्या हवामानानुसार आहारातील पदार्थही बदलायला हवेत. पण ऐन हिवाळ्यात आईसक्रीम खाणाऱ्या मुलांचे प्रमाण शहरात बऱ्यापैकी आहे. निदान बदलत्या वातावरणात तरी हे टाळायला हवे, असे बालरोगतज्ज्ञ सांगतात.

यामुळे बालकांची हॉस्पिटलमध्ये वाढली गर्दी कानटोपी व स्वेटर वापरण्याचा सल्ला आजारापासून मुलांना दूर ठेवा संसर्गजन्य आजारापासून मुलांना दूर ठेवण्यासाठी घरात सर्दी, खोकला, ताप असलेल्या सदस्यांनी स्वतःचे विलगीकरणात ठेवावे. हवामानात बदल झाला की, सर्वसामान्यांचेही आरोग्य बिघडते.

तसेच लहान मुलांमध्येही विषम. वातावरणामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. वातावरण बदलाच्या कालावधीत बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे. घरात लहान मुले असतील, तर मोठ्यांनी शिंकताना, खोकताना नाकासमोर रुमाल ठेवावा. घरात वावरताना मास्क वापरणे गरजेचे आहे.