५ ग्रामपंचायतीना इमारत निधी मंजूर : आ. देशमुख

सांगोला, ग्रामपंचायत प्रशासनाचा कार्यभाग व्यवस्थित पार पाडण्यासाठी सांगोला तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीना नवीन इमारतीची आवश्यकता होती. हीच बाब लक्षात घेऊन याबाबत आमदार बाबासाहेब देशमुख यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार सांगोला विधानसभा मतदारसंघातील जुनोनी, घेरडी, आलेगाव वासूद आणि पाचेगाव बु या पाच ग्रामपंचायतींना पुनर्र्चीत राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत नवीन ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पंचायतराज मंत्री व सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी ग्रामपंचायतीना इमारत बांधण्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा हि मागणी अधिवेशनापूर्वी केली होती. या मागणीची दाखल घेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तत्काळ या ग्रामपंचायतींना पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत निधी मंजूर केला आहे.