आष्टा येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण करण्यात येत आहे.आष्टा येथील सकल मराठा समाजातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवार दि. १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये दररोज पाच मराठा बांधव उपोषण करीत आहेत. मराठा आरक्षणाचे मार्गदर्शक मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बेमुदत उपोषण केले होते.
महाराष्ट्र सरकारच्या आश्वासनानंतर हे उपोषन थांबवण्यात आले. मात्र डिसेंबरपासून आष्ट्यातील अप्पर तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले. दररोज पाच मराठा बांधव उपोषणात सहभागी होत आहेत.