पेठ – सांगली रस्त्यावर सारखे अपघात होत आहेत. म्हंणून या रस्त्यावर तसेच आष्टा तासगाव रस्त्यावर क्रॉसिंगच्या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग इस्लामपूर यांना देण्यात आले. यावेळी शिवाजी चोरमुले, प्रभाकर जाधव, दीपक मेथे, राजू माने, प्रकाश सिध्द व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, आष्टा तासगाव रस्त्यावर मुख्य चौकालगत, महात्मा गांधी विद्यालय, कन्या विद्यालय हे या ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच याच मार्गावरील आष्टा नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पा जवळील शहरात जाणाऱ्या व तेथून पुढे वाळव्याकडे जाणाऱ्या रस्त्याला गतिरोधक बसवणे, दिशादर्शक फलक लावणे, अत्यंत गरजेचे बनले आहे. मागणीची पूर्तता न झाल्यास आष्टा शहर युवक काँग्रेस शरद पवार पार्टीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.