राजेवाडी तलावातून पाणी सोडल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. या पाण्यासाठी शेतकर्यांनी नुकताच रास्ता रोको केल्यामुळे हे पाणी सोडण्यात आले. पाण्याची उन्हाळी पाच आवर्तने सुटतात त्यापैकी एक आवर्तन जानेवारीत सोडले होते. दुसरे आवर्तन गुढीपाडवाल्या सुटते पण यंदा ते सोडले नव्हते. पाणी मिळावे म्हणून शेतकऱ्याची मागणी असूनही पाणी सोडले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्यासाठी रास्ता रोको केल्याने तलावातून पाणी सोडले.
राजेवाडी तलावाच्या पाण्यावर पुजारवाडी पांढरेवाडी उंबरगाव यासह सांगोला तालुक्यातील शेतकरी अवलंबून आहेत पाण्याविना शेतकऱ्याची पिके जळू लागली होती. आंदोलन व लोकप्रतिनिधीच्या पाठपुराव्यामुळे तलावातील पाणी सोडण्यात आले. राजेवाडीतून आवर्तन सोडल्याने ऊस, मका, कडवळ या पिकांना दिलासा मिळाला आहे तर पुजारवाडी, पांढरेवाडी, उंबरगाव या भागातील शेतकऱ्यांची पिके हिरवीगार होवू लागली आहेत ऐन उन्हाळात पिकांना पाणी मिळत असून पाण्यामुळे क्षेत्र ओलिताखाली आले आहे.