सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरकुल लाभार्थ्यांचा समावेश असून शासनाकडून घरकुलासाठी मिळणारा निधी अपुरा पडत आहे. शासनाने नुकतेच जाहीर केले आहे की घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी मोफत पाच ब्रास वाळू, रेती देण्याची घोषणा केली आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून बांधकाम खर्च, विटा, वाळू, सिमेंट, मजूर खर्च, पाणी खर्च भागवणे मुश्किल होत आहे. तरी शासनाने मदत म्हणून घरकुल लाभार्थ्यांना त्वरित मोफत पाच ब्रास वाळूचा पुरवठा करावा अशी मागणी लहुजी पैंथर सेनेचे अध्यक्ष नितीनभाऊ रणदिवे यांच्याकडून करण्यात येत आहे.
घरकुल लाभार्थ्याला शासनाकडून अपुरा निधी दिला जात असून या निधीतून घरकुलाचे काम पूर्ण करणे अवघड आहे. शासनाकडून मिळणाऱ्या निधी शिवाय लाभार्थ्याला स्वतः जवळील मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागतात. शासनाकडून मिळणाऱ्या निधीमध्ये लाभार्थ्यांचा वाळू सिमेंटचा खर्च भागत नाही तर घर कसे उभे करावे हा प्रश्न लाभार्थ्यापुढे आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता शासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे परंतु त्याची अंमलबजावणी वेळेवर होताना दिसत नाही. या सर्व गोष्टीचा विचार करून शासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास किंवा त्याहून अधिक वाळू मोफत देऊन त्याच्या घराच्या स्वप्नाला हातभार लावावा अशी मागणी नितीनभाऊ रणदिवे यांनी केली आहे.