आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस निरीक्षकांनी घेतला इचलकरंजी, हातकणंगले मतदारसंघाचा आढावा

आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. प्रत्येक पक्षातून जोरदार तयारी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. मोर्चेबांधणी, बैठका, सभा यांचे आयोजन सुरू आहे. अनेक नेते मंडळींचे दौरे देखील सुरू आहेत. अशातच काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक डॉ. चाके शैलजानाथ यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असून येथील सर्व विधानसभा मतदारसंघाचा ते आढावा घेत आहेत.

दोन दिवसापूर्वी त्यांनी हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती तसेच मतदार संघातील काँग्रेसचे वातावरण, उमेदवारा बाबतीत चाचपणी आढावा घेतला. तसेच त्यांनी बूथ कमिट्यांची मते देखील जाणून घेतलेली आहेत. त्यांनी वाळवा, शिराळा मतदारसंघात रविवारी भेटीगाठी घेतल्या. तर सोमवारी ते शाहुवाडी पन्हाळा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. समन्वयक म्हणून प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर त्यांच्या समवेत असणार आहेत.

दरम्यान ते दोन दिवसात या मतदारसंघाचा अहवाल राहुल गांधी यांच्यासमोर ठेवणार आहेत. यानंतरच खऱ्या अर्थाने इंडिया आघाडीतील जागा वाटपाची चर्चा सुरू होणार आहे.