ज्या दिग्गजाने टीममधून काढण्याची केलेली मागणी, तोच निवृत्तीनंतर बोलला, ‘विराट मॉर्डन क्रिकेटचा ब्रँड’

विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ७ मे रोहित शर्माने निवृत्ती घेतली होती. त्यापाठोपाठ आता विराटनेही निवृत्ती घेतली आहे. विराट कोहली याने सोशल मीडियावर पोस्ट करत १२ मे ला निवृत्ती जाहीर केली होती. विराटच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला, आता टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी विराटचा हा निर्णय क्रीडा चाहत्यांना धक्का देणारा आहे.

विराट कोहलीला एक दिग्गज ज्याने निवृत्ती घेतल्यावर त्याचे भरभरून कौतुक केले त्यानेच आधी विराटला ड्रॉप करण्याची मागणी केली होती. विराटची कसोटी क्रिकेटची सुरूवात काही खास राहिली नाही. विराट कोहलीला एक दिग्गज ज्याने निवृत्ती घेतल्यावर त्याचे भरभरून कौतुक केले त्यानेच आधी विराटला ड्रॉप करण्याची मागणी केली होती. विराटची कसोटी क्रिकेटची सुरूवात काही खास राहिली नाही.

कसोटीमध्ये विराटने सुरूवातीच्या सहा कसोटी सामन्यांमध्ये २१.२७ च्य सरासरीने बॅटींग केली होती. वेस्ट इंडिज नंतर ऑस्ट्रेलियातही दोन सामन्यात अपयशी ठरल्यावर संजय मांजरेकर यांनी विराटला वगळण्याची मागणी केली होती. संजय मांजरेकर यांचे ६ जानेवारी २०१२ चे ट्विट ज्यामध्ये, लक्ष्मणला बाहेर ठेवत रोहितला पुढील सामन्यासाठी नेऊ इच्छितो, कारण पुढे महत्त्वाचा ठरणार आहे. विराटला आणखी एक कसोटी द्या म्हणजे हे निश्चित होईल की हा फॉरमॅट त्याच्यासाठी नाही.

मॉर्डन क्रिकेटचा सर्वात मोठा ब्रँड, ज्याने क्रिकेटचा सर्वात जुना फॉरमॅट असलेल्या कसोटीसाठी आपले संपूर्ण योगदान दिले. कसोटी क्रिकेट कोहलीबाबत कृतज्ञ असल्याचं संजय मांजरेकरांनी म्हटलं आहे.