AC मुळेही होतो डोळ्यांना त्रास? यामागचं विज्ञान समजलं तर बसेल धक्का

ऑफिसमध्ये डोळ्यांना त्रास होण्यामागचं कारण केवळ कंप्युटरच नाही तर AC ही कारणीभूत (cause) आजकाल उन्हाच्या तीव्रतेपासून वाचण्यासाठी एसीचा वापर सर्वत्र वाढला आहे. घरी, ऑफिसमध्ये, कारमध्ये एसी वापरले जाते. पण कधी तुम्हाला कधी एसी चालू असताना डोळे कोरडे होतायत असं जाणवलंय का?

डोळ्यांत जळजळ होते, खाज येते किंवा डोळे सतत मिटावसे वाटतात? अनेकांना हे थकवा आल्यामुळे किंवा कंप्युटर स्क्रीन जास्त काळ वापरल्यामुळे होतंय असं वाटतं. पण असं नाही यामागे एसी कारणीभूत (cause) आहे. कल्पना करा बाहेर गरम वातावरण आहे. तुम्ही ऑफिसला पोहोचता आणि लगेच एसी सुरू करता. थंड हवा अंगावर आल्यानं जरा बरे वाटते. पण काही तास काम केल्यावर जाणवतं की डोळे चुरचुरत आहेत. काहींच्या डोळ्यांतून पाणी येतं, तर काहींना धूरसट दिसू लागतं. याचं मुख्य कारण आहे Dry Eye Syndrome. एसी सतत सुरू असल्यामुळे हवेतून ओलावा शोषला जातो. म्हणजेच, तुमच्या आजूबाजूचं वातावरण कोरडं होतं.

जेव्हा हवेत आर्द्रता कमी होते, तेव्हा डोळ्यांवर नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या अश्रूंचं बाष्पीभवन वेगाने होतं. त्यामुळे डोळ्यांची आद्रता टिकून राहत नाही आणि ते कोरडे पडतात.

मग यावर उपाय काय?
-एसीच्या खोल्यांमध्ये ह्युमिडिफायर वापरा.
-सतत स्क्रीनसमोर काम करत असाल, तर दर 20 मिनिटांनी 20 सेकंद डोळे बंद करा.
-पाणी भरपूर प्या आणि डोळ्यांत preservative-free लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स वापरा.
-शक्य असल्यास, एसीची तापमान मर्यादा 24–26°C ठेवा.