जाणून घेऊया फणसाचे फायदे :

फणसाच्या पिवळसर गऱ्यांमध्ये अनेक पोषकतत्वं आढळून येतात. फणस (jackfruit) हे उष्णकटिबंधीय फळ आहे. किनारपट्टी भागात फणसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. राज्यात कापा आणि बरका असे फणसाचे दोन मुख्य प्रकार आढळून येतात. फणसाच्या पिवळसर गऱ्यांमध्ये अनेक पोषकतत्वं आढळून येतात.


कोकणासह अनेक ठिकाणी फणसाच्या गऱ्यांची भाजी बनवली जाते.फणसामध्ये लिग्नांस, आयसोफ्लाव्होन सॅपोनिन्स यासारखे फायटोन्यूट्रिएंट्स असतात. जे शरीरात कर्करोगाच्या पेशी तयार होण्यापासून रोखते त्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी फणस हा एक रामबाण पर्याय ठरतो.

फणसात फायबर्सही चांगल्या प्रमाणाच आढळून येतं. त्यामुळे आतडे आणि पोट आतून स्वच्छ होऊन शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. याशिवाय फायबर्समुळे गॅसेस, पोटफुगी आणि बद्धकोष्ठतेसारख्या आजारांना दूर ठेवता येतं. फणसामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून हंगामी आजारांपासून शरीराचं रक्षण होऊ शकतं. फणसात असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे हायपोथायरॉईडीझमच्या रुग्णांसाठी फणस (jackfruit) हे औषधांपेक्षा कमी नाहीये.