उद्धव ठाकरे जाणार दिल्लीला…..

२०२४ हे वर्ष निवडणुकीचे वर्ष. सगळे नेतेमंडळी जोरदार हालचली मोर्चे बांधणीसाठी करत आहेत. नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे. हे वर्ष निवडणुकींच्या रणधुमाळीचं असणार आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाच्या मुद्द्यावरुन मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झालेला बघायला मिळतोय. असं असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठी यांच्यात जागावाटपावरुन चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जागावाटपापेक्षा भाजपला पराभूत करणं महत्त्वाचं आहे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. तसेच उद्धव ठाकरे पुढच्या काही दिवसांमध्ये दिल्लीत बैठकीसाठी जाणार आहेत, अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.