अंगणवाडी कर्मचान्यांचे प्रश्न मंत्रिमंडळात मांडू, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कागलमध्ये कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने आयोजित मोर्चासमोर नाम. मुश्रीफ बोलत होते. संघटनेच्यावतीने त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे वैधानिक असून त्यांना वेतनश्रेणीसह ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी आदी लाभ द्या. अंगणवाडी सेविकांना दरमहा २६ हजार रुपये व मदतनिसांना दरमहा २० हजार रुपये मानधन द्या. महागाई निर्देशांकानुसार दर सहा महिन्यांनी मानधनांमध्ये वाढ करा. महानगरपालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल कडून अंगणवाड्यासाठी पाच हजार ते आठ हजार भाडे मंजूर करावे.
आहाराचा आठ रुपये दर अत्यल्प आहे, त्यामध्ये वाढ करून सर्वसाधारण बालकांसाठी १६ रुपये व अति कुपोषित बालकांसाठी २४ रुपये करावा. यावेळी कॉग्रेड जयश्री पाटील, कॉम्रेड आप्पा पाटील, विद्या कांबळे, सुरेखा कांबळे, शमा पठाण, अर्चना पाटील, उज्वला बंडगर, अनिता माने, भारती कुरणे आदी पदाधिकाऱ्यांसह अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.