भारतात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणारे सुद्धा दहशतवादी ; शिवसेना आमदार संतोष बांगर

अनेक वादग्रस्त वक्तव्यं आणि आक्रमक कृतीमुळे कायम चर्चेत असलेले शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर ‘मला संधी द्या, खून का बदला खून से घेणार’ अशी मागणी त्यांनी पंतप्रधान मोदींकडे केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यातच आता पुन्हा एकदा, ‘सर्वसामान्य जनतेसमोर अतिरेक्यांना गोळ्या घाला आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना थेट गोळ्या घाला असं वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झालाय.

ते सुद्धा दहशतवादीच

‘भारतात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणारे सुद्धा दहशतवादी आहेत. क्रिकेटच्या मैदानात भारताचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्यांना या देशात राहाण्याचा अधिकार नसल्याचं बांगर म्हणाले आहेत. दहशतवादाला धर्म नसतो, मात्र जे दहशतवादी आहेत, ते एका विशिष्ट धर्माचेच का असतात ? असा प्रतिप्रश्ननही त्यांनी केलाय. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या भारतीयांवर अनन्वित अत्याचार होत असून भारतात मात्र विशिष्ट धर्मांच्या व्यक्तींसाठी पायघड्या घातल्या जातात. मग अशावेळी सामाजीक बांधिलकी, सर्वधर्म समभाव कुठे गेला असा सवाल त्यांनी पाकिस्तानच्या नेत्यांना केलाय.

मी माझा आक्रमकपणा सोडणार नाही

सततच्या होणाऱ्या टीकेलाही बांगरांनी (Santosh Bangar) ठोस प्रत्त्युत्तर दिलंय. ‘माझी भूमिका ही सर्वसामान्य नागरिकांच्या हिताची आहे. त्यामुळे माझ्या आक्रमकपणाचा, भूमिकेचा फायदा त्यांना होत असेल, तर टीकाकारांना घाबरून मी माझा आक्रमकपणा सोडणार नसल्याचं बांगरांनी सांगितलंय. मी आमदार नंतर आधी शिवसेनाचा जिल्हाप्रमुख आहे हे लोकांनी विसरू नये.’ प्रखर हिंदुत्व आणि आक्रमकपणाच्या मुद्यामुळेच उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदेसोबत आल्याचं त्यांनी सांगितलं.