पतंगबाजी अन् हुल्लडबाजीमुळे 40 जण जखमी

 नुकताच राज्यभरात मकरसंक्रात हा सण मोठ्या उत्सहात साजरा झाल्याचे पाहायला मिळाले. मकरसंक्रात म्हटलं की, तिळगुळ आणि पतंग हे आलंच. मकरसंक्रातीच्या दिवशी पतंग उडवण्याची मोठी परंपरा असते. मात्र पतंगासोबत लागणारा नायलॉन मांजा हा पक्षी, प्राणी आणि नागरिकांसाठी अनेकदा त्रासदायक ठरतो. नागपुरात असाच प्रकार घडला आहे. नागपुरात पतंगबाजी आणि हुल्लडबाजीमुळे नागपूरातील ४० जण जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बंदीनंतरंही नायलॅान मांजाचा पतंग उडवण्यासाठी नागपुरात सर्रास वापर करण्यात येत आहे.

तर बंदीनंतरंही नायलॅान मांजाचा वापर करून पतंग उडवणं सर्वसामान्य माणसांच्या जीवावर बेतलं आहे. तर नायलॅान मांजामुळे गळा चिरल्याने एक दुचाकीचालक जखमी झाला आहे. हा जीवघेणा प्रकार घडल्यानंतर नायलॅान मांजासह २० जणांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नायलॅान मांजामुळे जखमी झालेल्या १२ जखमींवर मेयो रुग्णालयात उपचार सुरु आहे